भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावसामाजिक

छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी प्रविण मोरे , उपाध्यक्ष अमोल पाटील तर सचिवपदी निलेश मराठे

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून राज्याच्या संस्थापक अध्यक्षपदी प्रविण मोरे , उपाध्यक्षपदी अमोल पाटील तर सचिवपदी निलेश मराठे प्रदेशाध्यक्ष पदी महादेव मोरे व प्रदेशउपाध्यक्ष पदी सागर पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठानच्या माध्यमातून गांव तेथे शाखा व घर तेथे मावळा जोडण्याचे कार्य हाती घेतले आहे, तसेच गडसंवर्धन शिवकार्य, सामाजिक कार्यासाठी छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान सदैव कार्यरत राहणार आहे.मागील काही दिवसांपुर्वी जळगांव येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये एका अनाथ मुलाला उपचारासाठी दाखल करून घेत नव्हते, त्यावेळी छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठानचे मावळे त्याठिकाणाहून जात असताना त्यांच्या निदर्शनास तो अनाथ मुलगा आला , तेव्हा विचारपूस करून छ. शिवशंभु परिवाराचे संस्थापक अध्यक्ष यांनी तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संपर्क साधून त्यामुलाला उपचारासाठी दाखल केले..!

गडसंवर्धन शिवकार्य सामाजिक कार्यासाठी छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठानचे कार्यकारी सदैवकार्यरत राहणार असे संस्थापक अध्यक्ष प्रविण मोरे, उपाध्यक्ष, अमोल पाटील, सचिव निलेश मराठे , प्रदेशाध्यक्ष महादेव मोरे, प्रदेशउपाध्यक्ष सागर पाटील व जळगांव जिल्हा अध्यक्ष विश्राम तेले व परिवाराचे सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांनी सांगितले .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!