भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

रेशनचे धान्य काळ्या बाजारात, जळगावात धान्याची परस्पर विक्री

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रेशनचे धान्य परस्पर काळ्याबाजारात विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याच्या कडून गहू,तांदूळ असा २ लाख ४८ हजार ५०० रुपये किमतीचा धान्य साठा जप्त करण्यात येऊन दोन वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.

या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की, जळगाव येथील शिवाजी नगरातील दूध फेडरेशनजवळील राजमालती नगरात मेहमूद बिसमिल्ला पटेल, रा.राजमालती नगर,यांच्या घरातून रेशनचा माल अवैधरित्या व परस्पर काळ्याबाजारात जात असल्याची माहिती दीपक गुप्ता यांनी येथील तहसीलदार नामदेव पाटील यांना दिली असता नामदेव पाटील यांनी सोमवारी ६ जून रोजी संध्याकाळी पुरवठा अधिकारी डिगंबर भिकन जाधव यांच्यासह एक पथक तयार करून घटनास्थळी रवाना केले होते.

या पथकाने या बाबत चौकशी केली असता सदरचे धान्य रेशनचे असल्याचे निष्पन्न झाले, त्याच्या जवळ या धान्याच्या कुठल्याही पावत्या नसल्याने अखेर तहसीलदार यांच्या पथकाने २२ हजार ५०० रुपये किमतीचा गहू व २ लाख २५ हजार किमतीचा ९० क्विंटल तांदूळ, १ हजार रुपये किमतीच्या धान्याच्या गोण्या असा एकूण २ लाख ४८ हजार ५०० रुपये किमतीचा साठा व मालवाहू वाहने ,एमएच ०६ एक्यू२१२४, आणि एमएच १९ सीवाय ६०६७ जप्त करण्यात आली आहेत. या बाबत पुरवठा तपासणी अधिकारी डिगंबर भिकन जाधव, रा.रायसोनी नगर,यांच्या फिर्यादीवरुन मेहमूद पटेल यांच्याविरोधात शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि संदीप परदेशी हे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!