खळबळजनक ; जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। काल एका अल्पवयीन मुलीवर पाच ते सहा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा खडबडजनक प्रकार घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
या बाबत अधिक माहिती अशी की,पाचोरा तालुक्यातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी शुक्रवारी १३ मे रोजी रात्री ९ वाजता गल्लीतील मैत्रीणीसोबत बोलत असताना रात्री उशीरापर्यंत मुलगी घरी आली नाही म्हणून घरच्यांनी तिचा शोध घेणे सुरू केला परंतु सर्वत्र शोध घेऊनही सापडत नसल्याने गावातील लोकांनी दुचाक्या काढून गावाच्या आजूबाजूच्या शेतात,परिसरात शोधमोहिम राबविली असता तरीही मुलगी मिळून आली नाही.
- वाळूचे अवैध उत्खनन रोखण्यात अपयश, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार निलंबित, दोघे भ्रष्टाचारात लिप्त असल्याचा चौकशीत ठपका
- मुक्ताईनगर/बोदवड तालुका व शहर काँग्रेस कमिटी आढावा बैठक संपन्न….
- निमखेडी बुद्रुक येथे अवैध दारू बंदीसाठी महिलांचा एल्गार
दरम्यान अज्ञात पाच ते सहा जणांनी अल्पवयीन मुलीला उचलून नेत तिच्यावर सामूहिकरित्या अत्याचार केला आणि पिडीत मुलीला पहाटे ३ वाजेच्या सुमारास गावातील महिलांच्या शौचालयाजवळ सोडून दिले. अल्पवयीन मुलगी घरी आल्यावर तिने संपूर्ण आपबीती सांगितल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीला आला. लागलीच पिडीत मुलीला पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. संशयित आरोपी हे गावातीलच असल्याची दाट शक्यता असून त्यांच्या शोधार्थ पोलीस त्यांचा शोध घेत आहेत