खिर्डी येथून दुचाकी लंपास
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील खिर्डी खु येथील रहिवाशी शेख नाजीम शेख शरीफ यांच्या मालकीची MH19.BX7990 या नंबर ची हिरो स्प्लेंडर प्रो कंपनीची मोटर सायकल घेवून यांचा मुलगा शेख राहील शेख नाजीम हा दि.१३-५-२२रोजी १:३० वा.मि सुमारास नेहमी प्रमाणे सुन्नी जामा मशिदीत नमाज पठण करण्याकरिता गेला असता सदर मोटर सायकल मशिदीच्या जवळ असलेल्या पशू वैद्यकीय दवाखान्या समोर उभी केली होती.
नमाज पठण करून दुपारी २:१५ वा.च्या सुमारास सुन्नी जामा मशिदीतून बाहेर आला असता सदर ठिकाणी मोटर सायकल न दिसल्याने आजू बाजूच्या परिसरातील लोकांना मोटर सायकल बाबत विचारपूस केली असता.सायकल कोण घेवून गेले याबाबत कोणतीही माहिती न मिळाल्याने गावात शोधाशोध करुनही मोटर सायकल मिळून न आल्याने कोणीतरी अनोळखी इसमाने २०००० रूपये किमतीची मोटर सायकल चोरून नेली आहे.
- यावल तालुका हादरला! सोनोग्राफी रिपोर्टच्या वादातून अंध माय-लेकाला विहिरीत ढकललं, चिमुकल्याचा मृत्यू, सासू व पतीला अटक
- ,
- .. आणखी एक क्रूर हत्याकांड, मुलीची हत्या करून मृतदेह लपवला फ्रिजमध्ये
याबाबत निंभोरा पोलिस स्टेशनला शेख नाजीम शेख शरीफ यांनी फिर्याद दिली असून अनोळखी व्यक्ती विरोधात भादंवि कलम ३७९ या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून.पुढील तपास सपोनि गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो कॉ रिजवान पिंजारी हे करीत आहे.




