धक्कादायक ; जळगाव जिल्ह्यात २७ वर्षीय विवाहितेवर बलात्कार
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील एका गावाच्या शेत शिवारातील विहिरीजवळ पाणी भरण्यास गेलेल्या २७ वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली.
पीडित विवाहित महिला शेतातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली असता यावेळी निरू भीमसिंग ऊर्फ जड्या बारेला हा देखील विहिरीवर पाणी भरण्यासाठी आला,त्याने पीडितेवर जबरजस्ती करून पीडिता आरोळ्या मारत असताना आरोपीने चापटांनी मारून ओरडू नको, नाहीतर तुझा गळा कापून टाकीन, असा दम देत विवाहितेवर बलात्कार केला.
या बाबत भडगाव पोलीस स्टेशनला निरू भीमसिंग ऊर्फ जाड्या बारेला, हल्ली रा. भडगाव, मूळ गाव झामटा, धवली, ता. सेंधवा, जि. बडवाणी, म.प्र. याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर हे करीत आहेत.