“तिला मानावे लागेल, मला तुझा अभिमान…”, सदाभाऊ खोतांचे चितळेला समर्थन
उस्मानाबाद, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : अभिनेत्री केतकी चितळे हिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यानंतर सर्वचस्तरावरुन प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान पोस्टनंतर सर्वचजण अभिनेत्री केतकी चितळेवर टीका करत आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळेचं समर्थन करत तिला मानव लागेल मला तिचा अभिमान असे म्हटले आहे.
- सावदा सह दूध उत्पादक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
- बनावट शालार्थ आयडी प्रकरणाला नवे वळण ; लॅब असिस्टंट ने केली २३ शिक्षकांची भरती,बनावट कागदपत्रांच्या आधारे वेतन, अजून कोण कोण सामील?
- सात गंभीर गुन्ह्यांतील ‘शोएब बिल्डर’ एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध ; येरवड्यात रवानगी
शरद पवार यांच्याबद्दल पोस्ट केल्यानंतर केतकी चितळेला अटक झाली. तिच्या विरोधात टिकेची झोड उठली असताना सदाभाऊ खोत हे केतकीच्या पाठिशी उभे आहेत. केतकी चितळे मला अभिमान असल्याच सांगत ती कणखर आहे. तिला समर्थनाची गरज नाही आणि तिला मानावे लागेल. न्यायालयात तिने स्व:ताची बाजू स्व:ता मांडली, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळेच कौतुक केलं आहे.
“सरकार पुरस्कृत दहशतवाद राज्यात वाढवता कशाला? देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही चंद्रकांत पाटील यांच्याबाबत वेगळा शब्द वापरुन टीका केली होती. त्यावेळी तुमची नैतिकता कुठे होती? अमोल मिटकरी ब्राह्मण समाजाला टार्गेट करतात त्यावेळी तुमच्या जिभेला हाड नव्हतं का? स्वत:वर टीका केली की सगळं आठवतं”, असा जोरदार हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला.





