Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमचोपडाजळगाव

धक्कादायक ; सहा वर्षाच्या मुलीवर तेरा वर्षाच्या मुलाचा बलात्कार

जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात एका ६ वर्षाच्या बालिकेवर १३ वर्षाच्या मुलाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली .या संदर्भात संशयित आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात गुरुवार दि. ८ रोजी सांयकाळी ५ ते ६.३० वाजेच्या दरम्यान शेजारी राहणाऱ्या मुलाने बॉल खेळण्यासाठी शेजारच्या घराच्या गच्चीवर असलेल्या पत्री खोलीत ६ वर्षाच्या मुलीला नेऊन तिच्या सोबत बळजबरीने शाररीक संबंध प्रस्थापित केले. पिडीत मुलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादी वरून या प्रकरणी विधीसंघर्ष बालकाविरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण हे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!