सुसाईट नोट लिहून रेल्वेखाली एसटी चालकाची आत्महत्या !
जळगाव, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीसमोर डाऊन लाईनवर एका एसटी चालकाने सुसाईड नोट लिहून रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोहचले असून मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, शिवाजीनगर अमरधाम समोर खांबा क्रमांक ४२०/२९/अ डाऊन लाईनवर सकाळी १० वाजेपुर्वी रेल्वेखाली आल्याने एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. १०.३० च्या सुमारास घटना गँगमनच्या निर्दर्शनास आली.
मृतदेहाच्या खिशात एक डायरी मिळून आली असून डायरीत असलेले सुसाईड नोट मध्ये म्हटले आहे की, माझी मनस्थिती खराब असल्याने मी हे टोकाचं पाऊल उचलत आहे. माझ्या आत्महत्येशी माझ्या परिवाराचा काहीही संबंध नाही असा उल्लेख त्यांनी केला आहे. शिवाजी पाटील यांच्या आत्महत्यामुळे जळगाव जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या तिसऱ्या आत्महत्येची नोंद झाली आहे. शहर पोलीस ठाण्याचे हवालदार आरपीएफचे पोलीस पुढील कार्यवाहीला करत आहेत.