भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

कुसुंबा येथील विवाहित तरुणांची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव येथून जवळच असलेल्या कुसुंबा येथील विवाहित तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

धनंजय चंद्रजित बाविस्कर, वय-२५ , रा. धनवाडी ता. चोपडा ह.मु. कुसुंबा ता.जि.जळगाव हे गेल्या दोन वर्षांपासून पत्नी उज्ज्वलासह कुसुंबा येथे कामानिमित्त राहतात,तो एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट कंपनीत नोकरीला होता. त्याच गावात धनंजयची बहिण शुभांगी आणि मेहुणे दिपक पाटील ही राहतात. अक्षयतृतीयेच्या निमित्ताने पत्नी उज्ज्वला माहेरी गेली असल्याने धनंजय घरी एकटाच होता. शनिवारी रात्री १० वाजता बहिण शुभांगीकडे जेवण करून तो त्याच्या घरी निघून आला.

सकाळी ११ वाजले तरी धनंजय का उठला नाही या बाबत शेजारी राहणाऱ्यांना शंका आली. त्यानी बहीण शुभांगीला माहिती दिल्यावर शुभांगी घरी आल्यावर भावाने रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्याच्या लक्षात आले.त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मयत घोषीत केले.या बाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!