जळगाव जिल्ह्यातील तहसीलदार आज “या” मागणी साठी सामूहिक रजेवर
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून दि. १३ रोजी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यातील तहसीलदार आज सामूहिक रजेवर असणार आहेत,’ग्रेड पे’च्या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातही सामूहिकपणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेने कळविले आहे.
राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे ४८०० रुपये करावा या मागणीसाठी आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून सामूहिक रजा आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वकल्पना देण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारी आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटने कडून कळविण्यात आले आहे.