महिला पोलीस अधिकाऱ्याच्या मोबाईलवर चोरट्यांचा डल्ला !
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
जळगाव, प्रतिनिधी: जळगाव शहरातील गोलाणी मार्केट मधील डिलाईटरोडवर महिला पोलीस अधिकाऱ्याचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना रविवारी २५ जुलै रोजी दुपारी घडली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्हा पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत योगिता गबरू राठोड रा. पोलीस मुख्यालयाच्या बाजूला सातपुवडा बिल्डींग दक्षता नगर, यां शहरातील गोलाणी मार्केट परिसरातील डिलाईट शॉप समोरील रोडच्या बाजूला मुलाचा वाढदिवसानिमित्त केक घेण्यासाठी कुटुंबियांसह काल रविवार २५ जुलै रोजी दुपारी १२.१५ ते १२.३० वाजेच्या दरम्यान गेल्या असता त्यांच्याकडील १७ हजार रूपये किंमतीचा महागडा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. आजूबाजूला परिसरात शोधाशोध केली परंतू मोबाईल आढळला नाही. रविवारी रात्री १० वाजता महिला पोलीस उपनिरीक्षक योगिता राठोड यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहे.