जळगावप्रशासन

मतदान केंद्रावर मतदाना वेळी आपली ओळख पटवून देण्यासाठी “हे” बारा पुरावे ग्राह्य धरले जातील

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ या मतदानावेळी मतदारांना मतदान केंद्रावर आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदारांना मतदार ओळखपत्रा शिवाय आणखी बारा प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्रा याशिवाय १)पासपोर्ट, २) वाहन चालक परवाना (लायसन्स ), ३) केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, ४) सार्वजनिक मर्यादित कंपनीचे स्वतःचे छायाचित्र असलेले ओळखपत्र, ५)बँक,टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, ६)पॅन कार्ड, ७)रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांचे द्वारे नॅशनल पोपुलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले स्मार्ट कार्ड, ८)मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले जॉब कार्ड, भारत सरकारच्या सर्व मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत निर्गमित हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड,९) छायाचित्र असलेले निवृत्तीवेतनाची कागदपत्रे, १०)खासदार आमदारांना देण्यात आलेली अधिकृत ओळखपत्र, ११) आधार कार्ड,१२) भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र हे बारा पुरावे मतदानासाठी आवश्यक असणार आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!