विवाहीतेचा विनयभंग करून मुलीचे अपहरण व अँट्रासिटीची खोटी केस दाखल करण्याची धमकी
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जिल्ह्यातील पारोळा शहरात राहणाऱ्या महिलेचा घरात घुसून एकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली असून इतकेच नाही तर पोलीस स्टेशनला माझ्या विरुध्द तक्रार केल्यास तुमच्यावर माझ्या मुलीचे अपहरण करण्याची व अँट्रासिटीची खोटी केस दाखल करण्याची धक्कादायक धमकीही दिली.
या बाबत अधिक माहिती अशी की, २७ ऑगस्ट रोजी पती शेतात तर मुलं शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेले असताना घरात विवाहिता घरी एकटीच असताना दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास शंकर विनायक ठाकुर याने पिडीत विवाहीतेकडे बघून हाताने ईशारे करुन त्याच्या घरात ये, असे सांगू लागला. पिडीत विवाहिता घाबरून घरात निघून गेली असता शंकर ठाकुर घरात जबरदस्ती घुसला आणि पिडीतेचा विनयभंग केला. पिडीतेने या वेळी आरडा-ओरडा केल्याने शंकर ठाकूर याने घटनास्थळावरून पळ काढला.
पती व दीर घरी आल्यावर पिडीत विवाहितेने त्यांना सदर घटना सांगितली. या बाबतचा जाब विचारण्यासाठी गेल्यावर संशयित आरोपीतांनी पिडीतेचा पती व दिर यांना मारहाण करुन शिवीगाळ करत धमकी दिली की, तुम्ही जर पोलीस स्टेशनला माझ्या विरुध्द तक्रार देण्यास गेले. तर तुमच्यावर माझ्या मुलीचे अपहरणाची व अँट्रासिटीची खोटी केस करेल. संशयित आरोपी ठाकूर हा नेहमी पिडीतेकडे बघून अश्लिल हावभाव करत असल्याचे देखील पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी शंकर विनायक ठाकुरसह त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.