अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवत अत्याचार
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। अमळनेर येथील गांधीलपुरा भागातील मेहतर कॉलनीतील तरुणाने एका अल्पवयीन मुली शी जबरदस्ती प्रेमसंबंध ठेवत धमकी देऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
या बाबत अधिक माहिती अशी की,कुणाल उर्फ आण्णा देवा घोगले याने शहरातील एका अल्पवयीन मुलीशी जबरदस्ती प्रेमसंबंध ठेवत धमकी देऊन अत्याचार केला तसेच त्याचा मित्र रवी घोगले याने तुझ्या घरातील लोकांना मारून टाकेल, अशी धमकी दिली,अशी माहिती पीडित तरुणीने तिच्या वडिलांना सांगितली, याबाबत पीडित तरुणीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून कुणाल उर्फ आण्णा देवा घोगले आणि रवी उर्फ रघूभाई घोगले या दोघांविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.


