रावेर लोकसभा निवडणूकीसाठी दोन उमेदवारांचे अर्ज दाखल,तर ८ उमेदवारांनी २४ अर्ज घेतले
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आज दि. २२ एप्रिल रोजी चौथ्या दिवशी रावेर लोकसभा निवडणूकीसाठी ८ उमेदवारांनी २४ अर्ज घेतले. रावेर लोकसभा मतदारसंघासाठी संजय प्रल्हाद कांडेलकर, मुक्ताईनगर (अपक्ष) यांनी ३ उमेदवारी अर्ज दाखल केले. तर प्रवीण लक्ष्मण पाटील, मलकापूर या अपक्ष उमेदवाराने एक उमेदवारी अर्ज दाखल केला.
तर मनोज नामदेव चौधरी, भुसावळ (अपक्ष), शेख इम्रान शेख बिस्मिल्ला, मलकापूर (अपक्ष), श्रावण काशिनाथ डहाळे, राजुरा, मुक्ताईनगर (अपक्ष), उमेश दत्तात्रय पाटील, ममुराबाद यांनी रवींद्र प्रल्हादराव पाटील, मानूर,बोदवड (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट) यांच्यासाठी, राहुल बापू साळुंके, किनगाव यांनी जगन देवराम सोनवणे, भुसावळ(अपक्ष) यांचेसाठी ४, विजय मधुकर साळुंके, किनगाव यांनी पुष्पाताई जगन सोनवणे, भुसावळ (अपक्ष ) यांच्यासाठी ४, गजानन रमेश रायडे, जामनेर (अपक्ष), शेख रमजान शेख करीम, भुसावळ यांनी नाजमीनबी शेख रमजान (सर्व समाज जनता पार्टी ) असे एकूण ८ उमेदवारांनी २४ अर्ज घेतले. तर अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी रावेर लोकसभा मतदारसंघासाठी संजय प्रल्हाद कांडेलकर, मुक्ताईनगर (अपक्ष) यांनी ३ उमेदवारी अर्ज दाखल केले. तर प्रवीण लक्ष्मण पाटील, मलकापूर या अपक्ष उमेदवाराने एक उमेदवारी अर्ज दाखल केला.