जळगाव जिल्ह्यात पुन्हा दोन कोरोना बाधित रुग्ण
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। कोरोनाच्या JN1 हा सब व्हेरियंट देशाभरात सापडल्याने खळबळ उडाली असून महाराष्ट्रातही या व्हेरियंटचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. त्यातल्यात्यात धक्कादायक बाब म्हणजे जळगाव जिल्ह्यातही २५ डिसेंबर रोजी भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथे कोरोनाचा पहिला ४३ वर्षीय रुग्ण आढळून आला होता.पुन्हा आता आणखी दोन कोरोना बाधित रुग्ण चोपडा येथे आढळून आले आहेत.
जिल्ह्यातील चोपडा येथे काल शनिवार दि.३० डिसेंम्बर रोजी कोरोना बाधित दोन रुग्ण आढळून आले असून या दोघा रुग्णांवर चोपड़ा उपजिल्हा रुग्णालयातील विशेष कक्षात (आयसोलेशन) उपचार सुरू आहेत. दोनही बाधित रुग्ण ३५ ते ३७ वयोगटातील महिला असून त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून आढळून आलेल्या दोनही रुग्णांची नमुने जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नवीन व्हायरसचा एकही रुग्ण अद्याप जळगाव जिल्ह्यात आढळून आलेला नाही
देशासह राज्यात कोरोनाने पुन्हा डोकेदुखी वाढवली असून पुन्हा एकदा राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. राज्यात कोरोनाचा JN1 जेएन–वन हा नवा व्हेरिएंट आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेच टेन्शन वाढलं असून केंद्र व राज्य सरकार कडून आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.