भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावशैक्षणिक

कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांच्या अचानक राजीनाम्याने चर्चेला उधाण, राजकीय हस्तक्षेपामुळे निर्णय ?

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव(प्रतिनिधी)। खान्देशातील नावारूपाला आलेले उत्कृष्ट विद्यापीठ म्हणून ओळखले जाणारे कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ पी.पी .पाटील यांनी आपला कुलगुरु पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सादर केला असून राज्यपाल यांनी तो राजीनामा मंजूरही केला आहे.

कुलगुरूंचा दिलेला राजीनामा हा राजकीय हस्तक्षेपातून दिला असल्याची जोरदार चर्चा असून ऑक्टोबर २०२१ मध्ये कुलगुरु डॉ.पी.पी .पाटील याचा कार्यकाळ संपण्याच्या आठ महिने अगोदरच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने शैक्षणिक श्रेत्रात चर्चेला उधाण आले असून त्याच्याशी संपर्क साधला असता ,कुलगुरू डॉ, पी.पी.पाटील यांनी राजीनामा दिल्याचा वृत्ताला दुजोरा दिला असून , प्रकृती ठीक नसल्याच्या कारणाने राजीनामा दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .असें असले तरी मात्र राजकीय हस्तक्षेपातून त्यांनी राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा असून शिक्षण क्षेत्रात मोठी खडबड उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!