आरोग्यजळगाव

आ. राजुमामा भोळे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)। भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा जळगावचे आमदार आ. राजूमामा भोळे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी घेऊन काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

जळगावचे आमदार तथा भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांची कोविड चाचणी पॉझिटीव्ह आलेली आहे. या संदर्भात मंडे टू मंडे च्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला असून यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेऊन स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. प्रकृती स्थिर असल्याचेही सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!