दुर्दैवी : बाथरूममध्ये शॉक लागून महिलेचा मृत्यू !
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहरातील योगेश्वर नगर येथे अंघोळीला जात असलेल्या महिलेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना रविवारी २० फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. तिला उपचारार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले.
मिळालेली माहिती अशी, घरामध्ये सकाळी आंघोळीसाठी सुषमा प्रकाश महाजन (वय ५७, रा.योगेश्वर नगर) बाथरूममध्ये गेल्या होत्या त्या वेळेला हिटरचा शॉक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ती फेकली गेली. त्यावेळी कुटुंबियांनी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्राची सुरतवाला यांनी मयत घोषित केले.
शनिपेठ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान, पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.