क्राईमजळगावपाचोरा

नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, आरोपीस अटक

जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या दोन महिन्यांपासून पाचोरा शहरात अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील एका ९ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मे २०२३ पासून ते आतापर्यंत आशा दोन महिन्यांपासून परिसरात राहणारा आरोपी सतीश शेजवळ याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा प्रकार पीडित मुलीने घरच्यांना सांगितल्याने पीडित मुलीसह घरच्यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी सतीश शेजवळ याच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिसांनी त्याला अटक केली असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!