भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

कैद्यांना सूट देणं भोवले, चार पोलीस कर्मचारी निलंबित !

जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : जिल्हा रूग्णालयात पोलीस कर्मचाऱ्यांनी कैद्यांना मोबाईल वापरासह नातेवाईकांना भेटण्याची मोकळीक दिली दारू पिण्याची मुभा कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पोलीस दलातील चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्हा सामान्य रूग्णालयात रविवारी रात्री कैद्यांमध्ये हाणामारी झाली होती. जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल कैदी सतीश गायकवाड व दशरथ महाजन या दोघांमध्ये रविवारी रात्री कैदी वॉर्डात झाल्यानंतर हा प्रकार घडला होता. या प्रकरणी वॉर्ड क्र. ९ मधील डॉक्टरांनी गोपनीय अहवाल वैद्यकीय अधिष्ठातांना दिला. यात रुग्णालयाच्या वॉर्डात येणारे कैदी पोलिसांच्या उपस्थितीत दारू प्राशन करून धुमाकूळ घालतात असे नमूद करण्यात आले होते. या कृत्यांमुळे जिल्हा रुग्णालयातील शेजारच्या वॉर्डात दहशत पसरली असून, रुग्णांनाा त्रास होतो आहे, असे नमूद केले होते.

सदरील प्रकरणात संदीप पंडितराव ठाकरे, पारस नरेंद्र बाविस्कर, किरण अशोक कोळी, राजेश पुरुषोत्तम कोळी या चौघा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्वत: या प्रकरणी चौकशी केली असता यामध्ये पोलीस कर्मचार्‍यांचा हलगर्जीपणा दिसून आला. यासाठी त्यांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले असता अनेक गंभीर बाबी उघड झाल्या. या अनुषंगाने चौकशीअंती डॉ. मुंढे यांनी पोलिस कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणावर ठपका ठेवत या चारही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!