भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Uncategorized

तहसील कार्यालयातील पंटर ४०० रूपयांची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।  जुने व जीर्ण झालेले रेशनकार्ड नवीन बनवून देण्यासाठी पराग पुरूषोत्तम सोनवणे ह्या खाजगी पंटर ला तक्रारदारा कडून ४०० रूपयांची लाच घेताना जळगाव लाचलुचपत पथकाने रंगेहात पकडले .

या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की,  जुने व जीर्ण झालेले रेशनकार्ड  नव्याने दुय्यम बनवण्यासाठी   जळगाव तहसील कार्यालयात  गेले असता तेथील  खासगी पंटर पराग पुरूषोत्तम सोनवणे ,वय-३९ रा. खोटे नगर, जळगाव यांनी त्या साठी  ४०० रूपयांची मागणी केली, या बाबत तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत विभागात याची तक्रार केली असता लाचलुचपत विभागाने १९ मे गुरुवार रोजी सापळा रचून संशयित खासगी पंटर पराग पुरूषोत्तम सोनवणे याला ४०० रूपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले.

ही कारवाई पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल शैला धनगर,सुनिल पाटील,सुरेश पाटील, पोहेकॉ अशोक अहीरे , रविंद्र घुगे, पो.ना.जनार्धन चौधरी पो.ना.मनोज जोशी,  पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर  कारवाई केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!