जळगावात लग्नाचे आमिष दाखवत तब्बल ६ वर्षे बलात्कार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जळगाव शहरात नोकरीनिमित्त वास्तव्यास आलेल्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत एकाने तब्बल ६ वर्षे अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला
मूळची बीड जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या पीडितेने जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात ही फिर्याद दिली आहे . संपत लक्ष्मण मल्हाड ( रा – दरिबाडची , ता. जत , जि . सांगली ) असे या आरोपीचे नाव आहे . त्याच्या विरोधात भा द वि कलम ३७६ , ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन २०१६ पासून ६ सप्टेंबर २०२१ पर्यंत हा आरोपी लग्नाचे आमिष दाखवत व जीवे मारण्याची धमकी देत वेगळ्यावेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार करीत होता. असे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे पुढील तपास करीत आहेत