भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावप्रशासन

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दोन दिवसांच्या जळगाव दौर्‍यावर

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दोन दिवसांच्या जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत असून यात ते जैन हिल्स आणि विद्यापीठातील कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

२७ व २८ फेब्रुवारी हे दोन दिवस महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे जिल्हा दौर्‍यावर येत असून रविवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांचे जळगाव एयरपोर्ट वर आगमन होणार असून त्यांचा मुक्काम जैन हिल्स येथे राहणार आहेत. तर दुसर्‍या दिवशी दि.२८ फेब्रुवारीला ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्रातील कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.जिल्हा प्रशासनाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा हा दौरा प्राप्त झालेला असून त्यांच्या दौर्‍यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!