भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

प्लॉटचे बनावट दस्तऐवज, खोटे मालक दाखवत जळगाव येथील व्यापाऱ्याला २२ लाख ५७ हजाराचा गंडा

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव येथील एका व्यावसायिकाला प्लॉट खरेदीच्या व्यवहारात तब्बल २२ लाख ५७ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. स्वस्तात प्लॉट देण्याचे आमिष दाखवत बनावट मालक उभा करणे, खोटे दस्तऐवज तयार करणे आणि विश्वास संपादन करून असे लाखो रुपये उकळण्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी राजू उर्फ प्रशांत बडगुजरला पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली.


मंगळवारी न्यायालयात हजर केले असता बडगुजरला चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या प्रकारामुळे प्लॉट माफियांचे रॅकेट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. भालचंद्र यशवंत चौधरी (वय ५५, रा. एम.जे. कॉलेजजवळ, जळगाव) यांनी तक्रार दिल्याने गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

त्यांच्या तक्रारीनुसार आरोपी राजू उर्फ प्रशांत बडगुजर, रतन ससाणे आणि इतर साथीदारांनी संगनमत करून नाशिक येथील गंगापूर शिवारातील प्लॉट विक्रीच्या नावाखाली मोठा आर्थिक घोटाळा केला. फिर्यादीला ओळखीचा आणि खात्रीशीर प्लॉट असल्याचे सांगून आरोपींनी वारंवार बैठका घेत विश्वास संपादन केला. आज घेतला नाही तर दुसरा ग्राहक तयार आहे असा दबाव टाकत लाखो रुपये रोख, बँक ट्रान्सफर आणि चेकद्वारे उकळले. आरोपींनी प्लॉटचे बनावट दस्तऐवज, खोटे मालक आणि बोगस व्यवहार दाखवत तब्बल २२ लाख ५७ हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, व्यवहार पूर्ण झाल्यानंतरही प्लॉटची नोंदणी न करता आरोपींनी टाळाटाळ सुरू ठेवली. संशय वाढल्यानंतर फिर्यादीने स्वतः चौकशी केली असता संबंधित प्लॉटचा मूळ मालक वेगळाच असल्याचे समोर आले. तसेच आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून संगनमताने फसवणूक केल्याचे उघड झाले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिक निरीक्षक निखिल पवार पुढील तपास करत असून आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!