भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

रेल्वेखाली झोकून देत तरुणांची आत्महत्या !

जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : शहरातील आसोदा रेल्वेगेटजवळ सोने कारागीर म्हणून काम करणाऱ्या १८ वर्षीय युवकाने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या (sucide) केल्याची घटना घडली असून त्याचे आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही.

प्रसनजीत कबीराज हा गेल्या दीड महिन्यांपासून सोने कारागीर म्हणून काम करण्यासाठी पश्चिम बंगालहून जळगाव शहरात आला होता. शहरातील मलाईकर यांच्याकडे तो सोन्याची दागिने तयार करण्याचे काम करून उदरनिर्वाह करत होता. सोमवारी १८ एप्रिल रोजी दिवसभर काम केल्यानंतर रात्री १० वाजता तो आपल्या सहकार्‍यांना मी बाहेरुन नाश्ता करुन येतो असे सांगून दुकानातून बाहेर पडला.

त्यानंतर त्याने आसोदा रेल्वे गेटजवळील अपलाईनवरील खांबा क्रमांक ४२० ते ४२२ दरम्यान धावत्या रेल्वेखाली झोकून देत आपले जीवन संपविले. स्टेशन मास्तर एम. अग्रवाल यांनी या घटनेची माहिती शनिपेठ पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सुरेश सपकाळे व सहाय्यक फौजदार रघुनाथ महाजन यांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला.

मयताची अंगाची झडती घेतली असता, त्याच्याकडे मोबाईल व आधारकार्ड आढळून आले. त्यावरुन त्याची ओळख पटली. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!