भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजामनेर

पुरवठा निरीक्षका कडे दीड लाखाच्या खंडणीची मागणी

जामनेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जामनेर येथील तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक विठ्ठल मच्छिंद्रनाथ काकडे याचे कडे रविंद्र सिताराम पवार,रा. शेदुर्णी व दिपक गायकवाड ,रा. वाकोद ता. जामनेर यांनी दीड लाखांची खंडणी मागून मारण्याची धमकी दिल्या धक्कादायक प्रकार घडला असून याबाबत जामनेर पोलीस स्टेशनमध्ये यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विठ्ठल मच्छिंद्रनाथ काकडे वय ४१ रा. मुक्काम धामगाव देवीचे ता. पाथर्डी जिल्हा अहमदनगर ह.मु. वाकी रोड पारिजात कॉलनी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २७ मे २०२२ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमरास जामनेर शहरात तहसील कार्यालयाच्या आवारात रविंद्र सिताराम पवार ,रा. शेदुर्णी व दिपक गायकवाड ,रा. वाकोद ता. जामनेर यांनी तुम्ही रेशनचा काळा बाजार केलेला आहे. मला १,५०,००० रुपये द्या नाहीतर मी तुमची व्हीडीओ क्लीप व्हायरल करीन व तुमची बदनामी करुन तुम्हाला निलंबित करेल.

तसेच तुमचे प्रमोशन होऊ देणार नाही, अशा प्रकारे विठ्ठल काकडे यांच्या मनात भिती घालवून खंडणीची मागणी केली. यावर विठ्ठल काकडे त्यांना म्हणाले कि, मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही, मी पैसे देणार नाही. यावेळी दोघांना काकडे यांच्या खिशातील मोबाईल असल्याचा संशय आल्याने मी रेकार्डींग करीत आहे, असे त्यांना वाटले. तेव्हा दोघांनी काकडे यांचा मोबाईल घेत चेक केला आणि तुम्ही माझी रेकार्डींग करीत आहे का?. मी तुम्हाला बघून घेईल तुम्हाला घरी येत मारीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी जामनेर पोलीस स्थानकात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील हे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!