क्राईमजामनेरसामाजिक

जामनेर येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मुकपदयात्रा काढून गोंडगाव घटनेचा निषेध….

जामनेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गोंडगाव ता. भडगाव येथील बालिका अत्याचार आणि निर्घृण हत्येप्रकरणी नराधम आरोपीस व आरोपीला मदत करणाऱ्या सर्वाना कडक शासन होण्यासाठी आज दिनांक- १० ऑगस्ट रोजी जामनेर तहसीलदार साहेब यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे एका गरीब कुटुंबातील लहान बालिकेवर त्याच गावातील सोन्या उर्फ स्वप्निल विनोद पाटील (वय – 19) या नराधमाने अत्यंत क्रूरपणे अत्याचार करुन निर्दयीपणे डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे पोलीस तपासात कबूल केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की,आम्ही खालील सह्या करणारे सर्व अ.भा.मराठा महासंघाचे पदाधिकारी आपणास याद्वारे विनंती करतो की, 1) सदर आरोपीस कठोरातील कठोर शासन व्हावे. 2) आरोपीच्या कुटूंबातील सर्वांची सखोल चौकशी करुन त्यांनी देखील या गुन्ह्यात मदत केली असेल तर त्यांना देखील कठोर शासन करावे. 3) आरोपी हा गुंड प्रवृतीचा असून त्याची मागील पार्श्वभूमी तपासावी. 4) अशा गुंड प्रवृत्ती पासून समाजाला अजून धोका पोहचू शकतो म्हणून जामीन मिळू नये. 5) सदर खटला जलदगतीने न्यायालयात चालवावा. 6) सदर खटल्यात सरकारी वकील म्हणून ऍड. उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करण्यात यावी. 7) सदर आरोपीस मृत्यूदंड सारखे शासन व्हावे जेणेकरून समाजात अशा प्रवृत्ती जन्माला येणार नाहीत.

या वेळी राहुल दत्तात्रय चव्हाण, अशोक कृष्णा पाटील, दिलीप खोडपे सर, डॉ. प्रशांत पाटील, डॉ.नंदलाल पाटील, माधव चव्हाण, अतुल सोनवणे, विश्वजित पाटील, नरेंद्र धुमाळ सुनील कानडे , दशरथ पाटील, उमेश पाटील नवल पाटील, सागर पाटील, शांताराम माळी,अशोक पवार, अजय मराठे,संदीप मराठे भरत पवार,संदीप पाटील, प्रवीण गावंडे, संदीप मराठे यांच्यासह शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या मुकपदयात्रेमध्ये उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!