जामनेरशैक्षणिकसामाजिक

वाकडी गरुड विद्यालयाचा “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या स्पर्धेत जामनेर तालुक्यातून तृतीय

जामनेर.मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l दि. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी संचलित अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड माध्यमिक विद्यालयाचा दिनांक १५/०३/०२४ वार शुक्रवार रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक एक येथे “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या स्पर्धेत तालुक्यातून तृतीय क्रमांक प्राप्त झाला.

“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या स्पर्धेत तालुक्यातून तृतीय क्रमांक मिळाल्याने  बक्षीस  जे.के. चव्हाण, माजी जि. प.अध्यक्ष  दिलीप खोडपे सर, माजी पंचायत समिती सभापती सौ. निताताई पाटील,माजी सभापती नवल पाटील, गटशिक्षणाधिकारी  लोहार साहेब डायटचे प्राचार्य  झोपे सर जि.प. सदस्या सौ. प्रमिलाताई पाटील शा‌.पो‌.आ. अधीक्षक  काळेसाहेब उपशिक्षणाधिकारी सरोदे साहेब तोंडापूर केंद्रप्रमुख संदीप पाटील यांच्या हस्ते स्विकारताना वाकडी केंद्राचे केंद्रप्रमुख  आर.के.वानखेडे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.पी. एन. पाटील विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय .डी.एम.गरुड उपशिक्षक  एस. वाय.चौधरी,आदी.उपस्थित होते.


या वेळी पुरस्काराचे स्वरूप पुष्पगुच्छ सन्मानपत्र व एक लाख रुपये विद्यालयास बक्षीस म्हणून घोषित करण्यात आले. या स्पर्धेत तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग घेतलेला होता. या स्पर्धेत अतिशय चुरस निर्माण झालेली होती अशा या चुरशीच्या स्पर्धेत वाकडी विद्यालयाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला. या स्पर्धेत विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनींनी आपापल्याला दिलेली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली त्यामुळेच सर्वांच्या सहकार्याने हे बक्षीस आपण मिळवू शकलो त्याबद्दल संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरुड, व्हाईस चेअरमन  आबासाहेब  भीमरावजी शेळके, सचिव आदरणीय सागरमलजी जैन सहसचिव आदरणीय दादासाहेब यू यू पाटील सर, कार्यालयीन सचिव  भाऊसाहेब  दीपक रावजी गरुड तसेच सर्व संचालक मंडळ यांनी विद्यालयाचे भरभरून कौतुक व अभिनंदन केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!