शिवसेना – युवासेनेने केलेल्या आंदोलनाची उपजिल्हा रुग्णालया कडून दखल
जामनेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जामनेर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गरजा लक्षात घेऊन युवासेना- शिवसेनेच्या वतीने १३ जुलै रोजी आंदोलन करण्यात आले होते.रुग्णालयात सोनोग्राफी, एक्स-रे,ओफ्रेशन थेटर या सुविधा मागच्या बऱ्याच काळापासून उपलब्ध नसल्यामुळे तालुक्यातील रुग्णांचे प्रचंड हाल होत होते.त्यामुळे युवासेना - शिवसेना जामनेर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना धारेवर धरत आवश्यक त्या गरजांची पूर्तता ८ दिवसांत मार्गी लावा न लागल्यास आंदोलनाचा इशारा युवासेना उपजिल्हाप्रमुख यांनी दिलेला होता.
याचं आंदोलनाची दखल घेत आज शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी मशीन,एक्स-रे मशिन, ओफ्रेशन थेटर या सुविधा दोनच दिवसात मार्गी लागलेल्या आहेतं. शिवसेना- युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विनय सोनवणे यांचे तालुका प्रमुखॲड.ज्ञानेश्वर बोरसे, युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण,अतुल सोनवणे,नरेंद्र धुमाळ,इसार मामु,सईद शेख, सुपडू माळी, मनोज मिस्तरी यांच्या वतीने आभार मानण्यात आलेले आहे व ज्या काही सुविधा अजूनही उपलब्ध करण्यासाठी बाकी असतील त्याचा विलंब न करता त्याही लवकरच उपलब्ध कराव्यात अश्या सूचना युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण यांनी दिलेल्या आहेतं.