मोटारसायकलींच्या समोरा-समोर झालेल्या धडके ३ जण ठार !
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : जामनेर तालुक्यात दोन मोटारसायकलींच्या समोरा-समोर झालेल्या धडकेत बाप लेकासह तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला असून जळगाव येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
- कोचुर खुर्द च्या लोकनियुक्त सरपंच ज्योती कोळी अपात्र
- पाडळसे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात, गटारी सफाई न झाल्यास संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
- निंभोरा स्टेशन परिसरातील सांडपाणी शोषखड्डा प्रकल्प रखडल्याने गटारीचे पाणी थेट रस्त्यावर
तालुक्यातील देऊळगाव गुजरी ते धामणगाव बडे या गावांच्या दरम्यान रात्री सुमारास समोरा-समोरून येणार्या दोन मोटारसायकलींची धडक झाल्याने या अपघातामध्ये देऊळगाव गुजरी येथील प्रवीण नामदेव माळी वय-४५ आणि त्यांचा मुलगा अतुल प्रवीण माळी वय-१७ हे एका दुचाकीवरील बाप-लेक जागीच ठार झालेत. खालीद जमशेद तडवी हे यात जखमी झाले, तर दुसर्या दुचाकीवर असणारा बुलढाणा जिल्ह्यातील खेडी पन्हेरी, ता. मोताळा येथील विलास भगवान गव्हाळ (वय २८) या युवकाचा ही मृत्यू झाला आहे.
मयतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले असून. तर या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या खालीद तडवी यांना उपचारासाठी जळगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.