अहिल्यानगर नामांतर करून काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालत नाही हे दाखवू द्या– पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
अहमदनगर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : स्वाभिमानी मुख्यमंत्री असाल अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर करा, जिल्ह्याच्या नामांतराचा निर्णय तत्काळ घ्या आणि आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालत नाहीत, हे सिद्ध करा, अशी मागणीकहे पत्र भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
- मुंबई-अयोध्या अमृत भारत एक्स्प्रेस सुरू! भुसावळसह “या ” स्थानकांवर थांबा ! मुंबई ते अयोध्या दरम्यान २४ साप्ताहिक फेऱ्या
- गावठी कट्टा व चार काडतुसांसह सुरत मधील सराईत गुन्हेगाराला अटक; ८.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
- शालार्थ घोटाळ्याच्या तपासाला वेग ; शाळांच्या १५ वर्षांतील तपासणीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश ! जळगाव जिल्ह्यातील १३९ शाळांचा समावेश
अहमदनगर येथे अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला होता. त्यामुळे आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 295 व्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्याला त्यांचं नाव देण्याची मागणी पडळकरांनी केली आहे. यांसदर्भातील एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवल्याचंही पडळकरांनी म्हटलं आहे. तसेच चौंडी येथे भक्तांना अहिल्यादेवी होळकरांचं दर्शन घेण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप करत गोपीचंद पडळकरांनी शरद पवार यांचा तीव्र शब्दात निषेध केला.
गोपीचंद पडळकरांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘ शेकडो हिंदुंचा बळी घेणाऱ्या मुंबई ब्लास्टचा सूत्रधार दाऊद इब्राहिमच्या बहिणीसोबत आर्थिक व्यवहार करणारे नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरद पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीत पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून रोखलं. हिंदू राजमाता जयंती म्हणजे यांना नातवाला लाँच करण्याचा इव्हेंट वाटतो? जेव्हा हिंदु मंदिरं लुटली जात होती, तेव्हा अहिल्यादेवींनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. म्हणून तमाम अहिल्यादेवी प्रेमींची भावना आहे की, अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला, त्या अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर करण्यात यावे.’
अहमदनगरच्या नामांतराचा तातडीनं निर्णय घ्यावा, असा इशाराही गोपीचंद पाडळकर यांनी दिला आहे. ते म्हणाले, ‘ हा निर्णय तातडीनं घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालत नाहीत, हे दाखवून द्या. स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा आणि होळकरशाहीचा सन्मान कराल, ही अपेक्षा आहे. अन्यथा हा बहुजन समाज जागा झालाय आणि संघटित झालाय, असा इशारा गोपीचंद पडळकरांनी दिलाय.





