जामनेर

जामनेर ते बोदवड रस्त्यावर दुचाकी-कारच्या अपघातात तीन ठार, तीन गंभीर!

जामनेर,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। जामनेर ते बोदवड रस्त्यावर दोन दुचाकी व कार ला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर- बोदवडच्या दरम्यान च्या रस्त्यावर वाडीकिल्ला गावाजवळ काल रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास मोठा विचीत्र अपघात झाला. यात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन दुचाकी एकमेकांना धडकल्यानंतर मागून आलेल्या कारने या दोन्ही दुचाकींना उडविले. बोदवडहून जामनेरकडे जाणार्‍या दत्तू रामा माळी आणि सुनील भोईल यांच्या दुचाकीचा वाडीकिल्ला येथून मालदाभाडी येथे जाणारे ईश्‍वर त्र्यंबक पारधी यांच्या दुचाकीची टक्कर झाली. यामुळे दोन्ही वाहने रस्त्यावर पडले. यातच भरधाव वेगात असलेल्या मागून आलेल्या कारने या दोन्ही दुचाकींना धडक दिली. या भीषण अपघातामध्ये दत्तू रामा माळी, सुनील भोई आणि ईश्‍वर त्र्यंकर पारधी यांचा मृत्यू झाला असून कारमधील तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

या महिलांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन दुचाकी आणि कारला एका अज्ञात वाहनाने कट मारल्याने दोन्ही दुचाकी एकमेकांवर आदळल्या त्यातच मागून आलेली कार त्यावरच आदळली. पुन्हा अजून एक पीकअप व्हॅन मागून येत होती. या पीकअप व्हॅन वाहनाच्या चालकाच्या अपघात झाल्याचे लक्षात येताच त्याने अचानक ब्रेक दाबला त्यामुळे ही व्हॅन देखील बाजूला जाऊन पडली त्यातील प्रवाशी मात्र किरकोळ जखमी झाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!