जळगाव जिल्ह्यात बनावट नोटांच्या छापखान्यावर छापा !
जामनेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जामनेर तालुक्यातील हिंगणा येथील उमेश चुडामण राजपूत हा तरूण २०० रुपयांच्या बनावट नोटांची छपाई करत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून त्याला दोनशेच्या बनावट नोटा व प्रिंटर सह अटक केली आहे.
- यावल तालुक्यात अमोल जावळे याना उस्फुर्त प्रतिसाद, सर्वसामान्यांकडून महायुती सरकारच्या निर्णयांचे कौतुक
- US Election 2024 Live Updates : अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय
- ब्रेकिंग : विनोद सोनवणे गोळीबार प्रकरणात तीन संशयित ताब्यात; दोन फरार !
जामनेर तालुक्यातील पहूर बसस्थानक एरियात रात्रीच्या वेळेला एक युवक संशयास्पद रित्या फिरताना दिसल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्या जवळ २०० रुपयांची बनावट नोट आढळून आल्याने पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता दोनशेच्या बनावट नोटाची आपण घरीच छपाई करीत असल्याचा धक्कादायक खुलासा त्याने केला,
त्या नुसार त्याने त्याच्या घरातून बनावट नोटा छापण्यासाठी लागणारे प्रिंटर,शाई,व २३ दोनशेच्या बनावट नोटा असे साहित्य काढून दिले,या बाबत पहूर पोलिसांनी उमेश चुडामण राजपूत,वय २२ ,रा.हिंगणे, ता. जामनेर याला अटक केली आहे.