भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजामनेर

संजय गांधी निराधार योजना;केवळ दलालांकडूनच आलेले प्रकरण मंजूर, तहसील कारकुनाला ५ लाखाचा दंड

जामनेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचे तत्कालीन लिपिक हे केवळ दलालांकडूनच आलेले प्रकरण मंजूर करीत असल्याच्या तक्रारी वरून त्यांना ४ लाख ९९ हजार दंड करण्यात आला आहे. कामातील अनियमितता व शासनाचे आर्थिक नुकसान केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

जामनेर तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार विभाग दलालांच्या सांगण्या वरून चालत असून केवळ दलालांकडून आलेले प्रकरणच मंजूर केले जात असून अशा लाभार्थ्यांनाच लाभ दिला जातो. संजय गांधी निराधार योजना समितीची मंजुरी न घेता परस्पर लाभार्थ्यांची नावे इतिवृत्तात समाविष्ट करून संजय गांधी निराधार योजना समिती व वरिष्ठांची स्वाक्षरी नसताना स्वतःच्याच स्वाक्षरीने लाभार्थ्यांना चुकीच्या पध्दतीने अनुदान वितरीत करून संजय गांधी निराधार योजना समिती व वरिष्ठांची स्वाक्षरी नसताना स्वतःच्याच स्वाक्षरीने लाभार्थ्यांना लाभ दिल्यासंदर्भात आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार नगरसेवक शेख रिजवान अब्दुल लतीफ यांनी पुराव्यांशी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्याकडे केली होती.

सदर प्रकरणाच्या चौकशीअंती तक्रारीत संजय गांधी निराधार योजनेच्या १३३ लाभार्थ्यांना चार लाख ९९ हजार रुपयांचा अनधिकृतपणे लाभ देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, आधी जामनेर व सध्या धरणगाव येथील सेवेत असलेले पुरवठा निरीक्षक एन. आर. शेख यांच्या पगारातून ही रक्कम वसूल करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी यांनी जामनेर व धरणगावच्या तहसीलदारांना दिले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!