रावेर तालुक्यातील तरुणांचा दगडाने ठेचून खून प्रकरणात सहा जण ताब्यात
रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील आदिवासी भागातील निमड्या येथील संजय पावरा वय ३२ वर्ष या तरुणांचा दगडाने ठेचून खून कऱण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
रावेर तालुक्यातील सातपुडा परिसरातील निमड्या या गावा जवळ संजय पावरा या तरुणाचे डोके व तोंड दगडाने ठेचून खून झाल्याने परिसरासह तालुक्यात खळबळ उडाली, ही घटना काल सकाळी उघळकीस आली,
मयत तरूणाच्या मोबाईलवरील कॉल्सचे विवरण वरून पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, तरूणाच्या खून झालेल्या ठिकाणाला अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, यांनी भेट दिली.त्यांचे सोबत फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे,रावेर पोलिस निरिक्षक कैलास नागरे हे होते.