बावीस वर्षीय तरुणीचा विनयभंग,हात पकडून जीवे मारण्याची धमकी
जामनेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जामनेर तालुक्यातील एका २२ वर्षीय तरुणीला डोळा मारून तिचा हात पकडला व अश्लिल बोलून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पीडित तरुणी तिच्या घरासमोर अंगनात धुनी-भांडी करत असतांना इमाम मंसुर तडवी याने तरुणीला डोळा मारुन तसेच अश्लिल शब्द बोलून तिचा विनयभंग केला तसेच सादिक हानिफ तडवी, सागर रमेश पाटील यांना घटनास्थळी बोलावुन यांनी सुध्दा पीडित तरुणीला अश्लिल शब्द बोलले. या नंतर रात्री 8 वाजेच्या सुमारास तरुणी शौचालयास जात असतांना बाभुळच्या झाडाजवळ इमाम तडवी याने तिचा हात पकडला व सादिक, सागर यांनी तरुणीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच तु जर कुणाला सांगीतले तर तुला मारुन टाकु, अशी धमकी दिली.
या बाबत पीडित तरुणीने तक्रार केल्याने पहूर पोलीस स्टेशनला इमाम मंसूर तडवी, सादिक हनिफ तडवी, सागर रमेश पाटील ,सर्व रा. ढाल गाव ता. जामनेर,या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


