भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयरावेर

सावदा भाजपा शहराध्यक्षपदी पुनश्च जे. के. भारंबेची वर्णी, उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष पदी रितेश पाटील

सावदा, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क| भारतीय जनता पक्षात संघटनात्मक नियुक्ती नुकत्याच करण्यात आलेल्या आहेत. त्यातील सावदा शहर अध्यक्ष पदासाठी विद्यमान शहराध्यक्ष जितेंद्र (जे.के) भारंबे यांच्यावर पक्षाने पुन्हा विश्वास दाखवत पुनश्च शहराध्यक्ष पदी निवड करण्यात करण्यात आली असून रावेर तालुका उद्योग आघाडी अध्यक्षपदी रितेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. त्याबाबतचे नियुक्तीपत्र जळगाव पूर्वचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.

प्रखर हिंदुत्वाचा चेहरा म्हणून ओळख असलेल्या जे. के. भारंबेंना त्यांचा दांडगा जनसंपर्क आपल्या पक्षनिष्ठतेची पावती म्हणून यापूर्वीच शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्यासोबत शहरातील बहुतांश नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करते झाले. मात्र बजरंग दल तथा संघ परिवारातील असलेले भाजपाशी एकनिष्ठ असलेले जे.के भारंबे व त्यांच्या नगरसेविका असलेल्या पत्नी रंजना भारंबे हे मात्र भाजपातच राहिले.

आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सावदा शहरातील पक्षाचे संघटन मजबूत करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या भारंबेंना पुढील निवडणुका लक्षात घेता पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याची जबाबदारी देत पुनश्च एकदा गळ्यात शहराध्यक्ष पदांची माळ टाकण्यात आली आहे. भारंबे यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात केलेली कामे तसेच बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जनतेचे कामे केली असून त्यांनी तालुका संयोजक तसेच सावदा शहर संयोजन म्हणून बजरंग दलाच्या माध्यमातून सामाज्यातील लोकांची कामे केली आहे. तसेच शहरातील युवा उद्योजक रितेश पाटील यांचा उद्योग विश्वात त्यांनी निर्माण केलेली स्वतःची ओळख या बाबी लक्षात घेता पक्षाने त्यांची भाजपा उद्योग आघाडीच्या रावेर तालुका अध्यक्षपदी निवड केली.

निवडी संदर्भात जे. के. भारंबे यांनी सांगितले, भाजप सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भाजपमध्येच कार्यकर्ता नेता होऊ शकतो. भाजप देशातीलच नव्हे तर, जगातील सर्वांत मोठा पक्ष असून या पक्षाचे ११ कोटी सदस्य आहेत. शहरात पक्षाचा आणखी विस्तार करायचा आहे. लोकांच्या हितासाठी पक्षविस्तार महत्वाचा असून, पालिकेत पुन्हा सत्ता आली पाहिजे. एकटा मीच अध्यक्ष नसून, सर्व कार्यकर्तेच अध्यक्ष आहेत. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या त्रिसूत्रीचा अवलंब करून या पदावर काम करत होतो आणि करत राहणार असून जनसेवेसाठी सदैव कटीबद्ध आहे,’ सर्वांच्या मदतीने हि जबाबदारी पार पाडून या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करीन असे भारंबे यांनी स्पष्ट केले.

या निवडीबद्दल दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे ना. गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, खासदार रक्षा खडसे, रावेर तालुका अध्यक्ष महेश चौधरी यांनी अभिनंदन केले असून या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!