भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

खिर्डी बु! येथे १३४ वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी!

खिर्डी, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि. १४ एप्रिल २०२५ रोजी १३४ व्या जयंतीदिनी खिर्डी बु। येथे समाज मंदिराजवळ बाबासाहेबांच्या प्रतिमेला लोकनियुक्त महिला सरपंच संगीता पाटिल यांच्या हस्ते प्रतिमा पुजन, पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ.आंबेडकर यांच्या जयंती निमित्त श्रीकृष्ण मंदिराचे मठाधीपति प्रदीप जी महाराज पंजाबी,प्रवीण धुंदले सर व ,जहुरे सर यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचे, विचारांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन त्यांना अभिवादन केले. तसेच नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सायंकाळी बँड व फटाक्यांची आतषबाजी करत जयंतीचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमातून गावामध्ये सामाजिक सलोखा, समता व बंधुभाव वृद्धीगत होण्यास मदत झाली. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करत संविधानिक मूल्यांचे स्मरण करण्यात आले. गावातील संपूर्ण समाज बांधव एकत्र येत हि जयंती उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी केली.

कार्यक्रमाला यांची होती उपस्थिती
खिर्डी गावाचे सरपंच सौ.सांगिता पाटिल ,प्रगतशील शेतकरी भास्कर पाटिल,उपसरपंच धीरज पाटिल, ग्रामपचांयत सदस्य नीता कोचुरे, अतुल पाटिल, माजी सरपंच महेंद्र कोचुरे, उमेश तायडे,योगेश जाधव,सिद्धार्थ जाधव, पत्रकार प्रवीण धुदले ,अंकुश जाधव, पत्रकार तथा जयंती उत्सव समितिचे सचिव विनायक जहूरे, सामाजिक कार्यकर्ते बेवन पिंजारी, अल्ताफ बेग, गफूर कोली, सागर लहासे,आशिष जहुरे, उत्सव समिती चे अध्यक्ष रवींद्र कोचुरे, उपध्यक्ष विनोद जाधव, वसंत जाधव,राजू जहुरे, कुंदन कोचुरे,अतुल सुरदास, कॉन्ट्रॅक्टर जितेंद्र पाटील, पत्रकार संकेत पाटील,व सर्व बौद्ध उपासक व उपाशीका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण धुंदले यांनी केले तर आभार विनायक जहुरे यांनी मांडले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!