भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

खिर्डी खु स्मशानभूमी परिसरात अंधाराचे साम्राज्य, वायर जोडणीस ठेकेदारास मुहूर्त मिळणार कधी?

Monday To Monday NewsNetwork।

खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी)। विवरा रस्त्यावर असलेल्या स्मशान भूमी परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने स्मशानभूमीत अंत्यविधी साठी रात्री बेरात्री प्रेत न्यावे लागत असता सदरील रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात गवत असून साप, वीचू, काट्याची भीती नेहमी असल्याने जीव धोक्यात घालून एक ते दीड कि.मी रस्ता पार करावा लागतो.तसेच स्मशान भूमी परिसरात विद्युत पोल बसविण्यात यावे याबाबत गावातील सामाजिक कार्यकर्ता राजू मांगो कोचुरे यांनी पंचायत समिती सदस्य दिपक पाटील यांचे कडे मागणी केली होती.सदर गोष्टीचा वेळोवेळी पाठपुरावा करून पंस,सदस्य दिपक पाटिल यांनी डीपीडीसी अंतर्गत सात पोल मंजूर आणून काम पूर्ण झाले आहे.परन्तु सबंधित ठेकेदार जाणून बुजून कानाडोळा करत असल्याने अद्यापही वायर जोडून विज पुरवठा सुरू करण्यात आला नाही.

सम्बधित ठेकेदारास वीजपुरवठा सुरू करण्याचा मुहूर्त कोणत्या तारखेला निघेल याची निश्चिती नाही.ग्राम पंचायतचे सुद्धा याकडे लक्ष नसल्याच बोललं जात असून मुहूर्त शोधायचा कोणी? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. कोणाच्या जीवाला काही बरे वाईट झाल्यास जबाबदार कोण राहील.तसेच लवकरात लवकर विज पुरवठा सुरू करण्यात यावा अशी मागणी राजू कोचुरे यांनी केलेली आहे.

राहुल फालक ,सरपंच ,खिर्डी खु. विवरा रस्त्यावरील स्मशान भूमी मध्ये लाईट अभावी रात्री बेरात्री अंधारातून जीव धोक्यात घालून एक ते दीड किमी चा रस्ता पार करावा लागतो.काम पूर्ण झाले असून विज पुरवठा सुरू करण्यासाठी फक्त ५ ते ६ फूट वायर जोडणी करण्यास ठेकेदार दुर्लक्ष करीत असून तातडीने विज पुरवठा सुरू करण्याबाबत ठेकेदारास फोन करीत असून फोन नेहमी स्विच ऑफ येतो.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!