पूनखेडा ते पातोंडी रस्त्याची दयनीय अवस्था
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे ,प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील पूनखेडा ते पातोंडी हा ५.किमी रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सन २०१८ या वर्षी पूर्ण करण्यात आले होते.तसेच हा रस्ता रावेर आणि मुक्ताईनगर या दोन तालुक्यांना जोडणारा प्रमुख मार्ग असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ नेहमीच सुरू राहते.
या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून वाहनधारकांना खड्डे चुकवितांना समोरून वाहन आल्यास खड्डेमय रस्त्यावरून जीव धोक्यात घालून वाहन धारकांना प्रवास करावा लागत असल्याने कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे.अनेकदा खड्डयांमुळे संतुलन बिघडल्याने मोटर सायकलस्वार पडून गंभीर जख्मी झाले आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावरील खड्डे उघड्या डोळ्यांनी दिसत असतांनाही खड्डे बुजविण्याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे.या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून संबंधित विभागाने त्वरित लक्ष देवून खड्डे बुजविण्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा परिसरातील वाहन चालक व ग्रामस्थांनी दिला आहे.