खिर्डी बु.येथील हौदात पाणी नसल्याने पशुपालक त्रस्त….
Monday To Monday NewsNetwork।
खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी)। ऐंनपुर रोड वर गुरांना पाणी पिण्याकरीता हौद बांधण्यात आला आहे मात्र त्या ठिकाणी बहुतेक वेळा गुरांना पिण्यासाठी वेळेवर पाणीच उपलब्ध नसल्यामुळे गुरांना पाणी पिण्यास खूप अडचण होते तसेच हौदा वरून केळीचे बॉक्स व फणीचे ट्रक भरणेसाठी येत असून सदर ठिकाणाहून दररोज १० ते १५ ट्रक ४००ते५०० लिटर पाणी टाकीत भरत असून संपूर्ण हौद खाली होत असल्याने पाण्याची पातळी खोलवर गेल्यानंतर लहान मोठ्या गुरांना व्यवस्थित रित्या पाणी पिता येत नाही.या सर्व गंभीर प्रकाराकडे खिर्डी बु.ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित लक्ष देवून हौदाची साफ सफाई करून गुरांना पूर्णवेळ मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध राहील याची योग्य ती उपाय योजना करून केळी ट्रक चालकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावातील पशूपालकांसह मुरलीधर पाटील, सुनील पाटील,आदींनी केली आहे