भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

कोचुर खुर्द च्या लोकनियुक्त सरपंच ज्योती कोळी अपात्र

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील कोचुर खुर्द येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच ज्योती संतोष कोळी यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना सरपंच पदावरून अपात्र करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहेत .

ज्योती संतोष कोळी ह्या रावेर तालुक्यातील कोचूर खुर्द येथील ग्रुप ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच पदी निवडून आल्या होत्या. मात्र दिलेल्या मुदतीत लोकनियुक्त सरपंच ज्योती कोळी यांनी वैध जात प्रमाणपत्र शासनाकडे सादर केले नव्हते. या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य लीलाबाई घनशाम तायडे यांनी आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासमोर सुनावणी होऊन यात मुदतीच्या आत  जात प्रमाणपत्र सादर न केल्याने रावेर तालुक्यातील कोचुर खुर्द येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच ज्योती संतोष कोळी यांना अपात्र घोषित ठरवण्यात आल्याचे दि. ३० मार्च २०२५ रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आदेश काढले. सदरचे आदेश रावेर तहसीलदार व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व कोचुर खुर्द ग्रामपंचायत यांना पाठवण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!