भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

आज पासूनच एलपीजी गॅस सिलिंडर झाला स्वस्त, जाणून घ्या नवे दर

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती बाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत घट झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी १ मे पासून तत्काळ प्रभावीपणे व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती १९ रूपयांनी कमी केल्या आहेत. यासह, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत ₹ १७४५.५० इतकी झाली आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आजपासूनच देशातील विविध शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १९ रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. मात्र, या कपातीचा लाभ केवळ १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवरच मिळणार आहे. यावेळीही घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.गेल्या महिन्यातही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती.या आधी  १ एप्रिलपासून १९ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत ३५ रुपयांनी कमी करण्यात आली होती.

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती ‘जैसे थे’
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती मार्च महिन्यात कमी झाली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला दिनानिमित्त (८ मार्च २०२४) एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली होती. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे ७ मार्चला मोदी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या बाबतीत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. त्यानंतर मंत्रिमंडळाने ३१ मार्च २०२५ पर्यंत पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ३०० रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!