आरोग्ययावल

विरोदा येथे घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

विरोदा,ता.यावल. मंडे टु मंडे न्युज.किरण पाटील l यावल तालुक्यातील विरोदा येथे चौफेर गटारी घाणीने भरल्या असून साफसफाई वेळेवर होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. या मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.अनेक वेळा नागरिकांनी तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नसून या बाबत विचारले असता उडवा उडवी उत्तर दिले जातात.

गटारी घाणीने भरल्या असल्याने डासांच्या उपद्रव् सारखा सुरू असल्याने नागरिकांनी ग्रामपंचायत बाबत संताप व्यक्त केला आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने उष्णतेत वाढ झाली आहे. डासांचा त्रास होत असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. तसेच रोज ग्रा . प. चे ट्रॅक्टर नियमित गावांमध्ये कचरा उचलायला जात नसल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. ग्रामपंचायत च्या सरपंच सह सदस्यांनी याची दखल घेणे जरुरीचे आहे. या बाबत त्वरित दखल न घेतल्यास ग्रामपंचायत समोर उपोषणाचा मार्ग पत्करला जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!