भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

पूर्व सूचना न देता लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने रेमेडीयल परीक्षा बंद केल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे नुकसान

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने यावर्षी रेमेडीयल परीक्षा अचानक बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो नियम, निर्णय विद्यापीठाने चालू अकॅडमी केअर मध्ये घेतलेला आहे तर विद्यापीठ ते करू शकत नाही व जो ही निर्णय घ्यायचा असतो तो निर्णय येणाऱ्या नवीन बॅचला लागू होतो, या बाबत विद्यार्थ्यांना कुठलिही पूर्व सूचना सुद्धा दिलेली नाही, पूर्व सूचना न देता लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने रेमेडीयल परीक्षा बंद केल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.

तसेच विद्यापीठाचे अजून खूप प्रश्न आहेत. विद्यापीठाची वेबसाईट खूप दिवस झाले बंद आहे, त्याच प्रमाणे स्टुडन्ट पोर्टल सुद्धा बंद आहे. विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की, रेमेडीयल परीक्षा ज्या विद्यार्थ्याना पहिल्या वर्षापासून होती, ती त्या बॅचच्या विद्यार्थ्यांना पूर्ण होईस्तोवर चालू राहू द्यावी. विद्यापीठ ते मध्येच बंद करू शकत नाही. जो ही नवीन नियम लागू करायचा असेल तो नवीन बॅचपासून लागू होईल व करावा. व लागू असलेल्या जुन्या बॅच ला पूर्ववत सरू ठेवावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे .या बाबत २४० विद्यार्थ्यांनी सह्यानिशी निवेदन  रायगड जिल्ह्यातील आणेर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हायटेक एज्युकेशन मंत्री चंद्रकांत दादा पाटील, महाराष्ट्राचे गव्हर्नर यांचे कडे ई मेल करून तक्रार वजा विनंती केली आहे.तसेच विद्यार्थ्यांनी ट्विट सुद्धा केलेले आहेत.या बाबत विद्यार्थ्यांची अद्यापपर्यंत कुठल्याही स्तरावर दाखल घेतली गेलेली नाही.या बाबत वरिष्ठ स्तरावरून लवकरात लवकर दखल घेऊन विद्यार्थ्यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र  विद्यापीठ. आणेर.जी रायगड. यांनी रेमेडीयल परीक्षा चालू करावी अशी मागणी अडचणीत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!