क्राईमरावेर

“त्या” ढाब्यांवर देशी – विदेशी दारूची विक्री सुरूच, कारवाई साठी अधिकारी आले अन् … हसत – खेळत ढाब्यांना भेटी देऊन गेले..

सावदा, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यातील सावदा – खिरोदा रस्त्यादरम्यानच्या परिसरात तील ढाब्यांवर व हॉटेली वर देशी – विदेशी दारूची मोठ्या प्रमाणावर सर्रास विक्री सुरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले, या बाबत संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता कारवाई सुरू असल्याचे सांगितले गेले . मात्र या बाबत अधिक प्रत्यक्ष चौकशी केली असता, मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क अधिकारी चौकशी साठी आल्याची माहिती मिळाली,परंतु आलेले संबंधित खात्याचे लोक ढाबे, बियरबार हॉटेल्स वर गप्पा गोष्टी करत वेळ घालवल्याची माहिती मिळाली, चौकशी साठी आले म्हणजे काय? सर्व माहिती आहे कुठे काय मिळतं? कुठे कुठे अवैध दारू विकली जाते, प्रत्येक विक्रेत्यांकडून सहा हजार रुपये हप्ता दिला जात असल्याची माहिती एका ढाबा चालकाकडून नाव न सांगण्याच्या बोलीवर सांगण्यात आले .

या ढाब्यावर, हॉटेली वर दारू कुठून आणली जाते, कोण होलसेल दारू विक्रेता आहे की त्यांच्याकडून हे विक्रीसाठी विकत घेतात.राज्य उत्पादन शुल्क वीभाग,पोलिस स्टेशन याना या बाबत संपूर्ण कल्पना आहे परंतु अर्थपूर्ण संबंधातून या कडे दुर्लक्ष केलं जातं असल्याचं बोललं जातं. सध्या आचारसंहिता सुरू असताना सुद्धा खुलेआम अवैध दारूची विक्री सुरूच आहे.

ही दारू बनावट तर नव्हे?
या होटेली व ढाब्यावर अवैध विकली जाणारी देशी – विदेशी दारू बनावट नकली दारू तर नव्हे ?असा प्रश्न दारू शैकिनांकडून विचारला जात आहे.

या भागातील ढाब्यांवरील अवैध दारू विक्रीवर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. उलट त्यांना संरक्षण दिलं जातं.त्यांना सांगितलं जातं की जरा सांभाळून! संबंधित राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभाग वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील का?

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!