भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

आज विधानपरिषद निवडणूक : आर्थिक घोडेबाजार होणार,? काँग्रेसच्या बैठकीला दोन आमदार अनुपस्थित

मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l ११ विधानपरिषद आमदारांचा सहा वर्षांचा कार्यकाळ २७ जुलै रोजी संपणार आहे, त्या जागा भरण्यासाठी आज विधान परिषदेची निवडणूक होत आहे.मतदान प्रक्रिया विधीमंडळात पार पडेल. ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्यामुळे कोणत्या उमेदवाराचा पराभव होणार याची राजकीय वर्तुळात अधिक उत्सुकता लागली आहे. म्हणून या निवडणुकीत विजयासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता असताना काँग्रेस आमदारांच्या बैठकीला दोन आमदार अनुपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे.

या बैठकीत महाविकास आघाडी प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले. काँग्रेसकडून रमेश चैनीथला, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित होते. तर ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर, अनिल परब, अनिल देसाई, विनायक राऊत महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हजर होते. या बैठकीत महाविकास आघाडी प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले.

या बैठकीला काँग्रेसचे झीशान सिद्दीकी, व जितेश अंतापूरकर हे दोआमदार उपस्थित नसल्याने घोडेबाजार होतो का? अशा चर्चा होऊ लागल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!