रान डुकरांसाठी लावलेल्या जाळ्यात अडकला बिबट्या, रावेर तालुक्यातील घटना
सावदा, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यात रानटी डुकरांसाठी लावलेल्या जाळ्यात बिबट्या अडकून पडल्याची घटना तालुक्यातील सुदगाव शेत शिवारात आज उघडकीस आली.
या बाबत अधिक वृत असे की रावेर तालूक्यातील तापी परिसरातील सुदगांव या गावच्या जंगलांत तापी नदी काठी मैत्री लॉन जवळ रान डूकरांना पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात चक्क बिबट्या पकडला गेल्याचे एका शेतकऱ्यांच्या निदर्शनास येताच ही गोष्ट वाऱ्या सारखी पसरली असता बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होवू लागली याची माहिती पोलीस प्रशासनाला तसेच वन विभागाला देण्यात आली सदर ठिकाणी पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त असुन बिबट्याला रेस्क्यु करण्याचे काम सुरु आहे. प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले की बऱ्याच वेळे पासून जाळ्यात अडकुन पकडलागेला असल्या मुळे बिबट्याचा आवाज येत नसल्याचे सांगितले जात आहे
विशेष म्हणजे हा बिबट्या आज पर्यंत कोणत्याही शेतकऱ्याला दिसून आला नाही.
