Champa Shashti : “चंपाषष्ठी” खंडोबाचा नवरात्र उत्सव, आख्यायिका, जन्म, अधिक माहिती व धार्मिक महत्त्व जाणून घेऊ या !
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क।। येळकोट येळकोट जय मल्हार॥ #चंपाषष्ठी! मार्गशीर्ष महिन्यात ‘शुद्ध षष्ठी’ ही तिथी ‘चंपाषष्ठी’ म्हणून साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या दिवशी ‘मल्हारी नवरात्री’ला प्रारंभ होतो. त्यामुळे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत सहा दिवसांची नवरात्र असते. यालाच ‘खंडोबाची नवरात्र’ असे म्हणतात. सहा दिवसांचे हे नवरात्र असल्याने ‘षडरात्र’ आई अधिक संयुक्तपणे म्हटले जाते. खंडोबाच्या जेजुरीमध्ये हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी या तिथीची देवता खंडोबा किंवा मल्लारी, चंपाषष्ठी, स्कंदषष्ठी, मार्तंडभैरवोत्थापन आहे. खंडोबा हा ज्यांचा कुलदेव असतो. त्यांच्या घरात चंपाषष्ठीच्या निमित्ताने खंडोबाचे नवरात्र साजरी केली जाते. या वर्षी सोमवारी दि. १८ डिसेंबर रोजी आहे चंपाषष्ठी
चंपाषष्ठीच्या दिवशी कुलधर्म असतो. या दिवशी खंडोबाला महानैवेद्य अर्पण करतात. त्यात ठोंबरा, कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ असतात. ठोंबरा हे नाव काहींना अपरिचित वाटेल. जोंधळे शिजवून त्यात दही, मीठ घालून केलेल्या पदार्थाला ठोंबरा म्हणतात. तसेच गव्हाच्या लोंब्या, हुरडा, तीळ आणि गूळ हे पदार्थ एकत्र करून त्याचा दिवा करतात. त्यात फुलवात लावतात. महानैवेद्य दाखविण्यापूर्वी तळी भरतात. एका ताम्हनात पाने, पैसा, सुपारी, भंडार व खोबरे हे पदार्थ ठेवून येळकोट असा उद्घोष करून ते ताम्हन तीनदा उचलणे यालाच ‘तळी भरणे’ म्हणतात. ताम्हन उचलताना प्रत्येकवेळी भंडार भरलेली खोबऱ्याची वाटी मोडतात. मग दिवटी बुधली घेऊन आरती करतात. मग जेजुरीच्या दिशेने चार पावले जाऊन देवाला ओवाळतात व भंडार उधळून पुनश्च जागेवर येतात. लाक्षणिक अर्थाने याला ‘जेजुरीला जाऊन येणे’ असे म्हणतात. नंतर दिवटी दुधाने विझवतात.
मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी या तिथीची देवता खंडोबा किंवा मल्लारी ही आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी महाराष्ट्रात जेजुरी येथे खंडोबाचा उत्सव असतो. मणि आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले. या घटनेचे स्मरण रहावे म्हणून चंपाषष्ठीला हा उत्सव साजरा करतात. मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेपासून सुरू झालेला हा उत्सव चंपाषष्ठीच्या दिवशी समाप्त होतो. या नवरात्रात घटस्थापना, नंदादीप, खंडोबाची पूजा , मल्लारी माहात्म्याचा पाठ , एकभुक्त राहणे , शिवलिंगाचे दर्शन, वाघ्या-मुरळी भोजन , भंडार ( हळद) उधळणे इत्यादी गोष्टी करतात. कुत्रा हे खंडोबाचे वाहन असल्यामुळे त्यालाही खाऊ घालतात.
मल्लारी मार्तंड –
खंडोबा मल्लारी, मल्लारिमार्तंड, म्हाळसाकांत, मैलार, मैराळ इत्यादी नांवांनी ओळखला जातो. खंडोबाइतके महाराष्ट्रात कोणतेही लोकप्रिय दैवत नाही.
खंडोबाची एकूण बारा स्थाने आहेत. (१) जेजुरी —पुणे (२) निंबगाव — पुणे (३) पाली पेंबर — सातारा ( ४) नळदुर्ग — धाराशिव (५) शेंगुड — नगर (६) सातारे— औरंगाबाद (७) माळेगाव — नांदेड (८) मैलारपू पेंबर — बिदर (९) मंगसुळी — बेळगाव (१०) मैलारलींग — धारवाड (११) देवरगुड— धारवाड (१२) मण्मैलार — बेळुळारी, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या सांस्कृतिक अनुबंधाचे हे एक प्रकट प्रतीक आहेत. मल्लारिमाहात्म्य नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथामध्ये खंडोबाच्या चरित्राची कथा आहे. खंडोबा, म्हाळसा आणि बाणाई यांची कथा तुम्ही पाहिली असेलच. खंडोबाच्या चार आयुधांपैकी खड्.ग हे विशेष महत्त्वाचे आहे. या खड्.गाला ‘खांडा’ म्हणतात. खांडा ज्याच्या हाती आहे तो खंडोबा असे नाव रूढ झाले. खंडोबा हा मूळचा ऐतिहासिक वीर पुरुष होता आणि त्यालाच देवरूप आले असेही सांगण्यात येते.
खंडोबाच्या उपासनेत भंडारला फार महत्त्व आहे. हळदीच्या चूर्णाला ‘भंडार’ म्हणतात. चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाच्या जत्रेत भंडार उधळतात. भक्त भंडार मस्तकाला लावतात. खंडोबाची उपासना कर्नाटकमधून महाराष्ट्रात आली असेही संशोधकांचे मत आहे. इसवी सणाच्या चौदाव्या शतकाच्या पूर्वींपासून खंडोबाच्या मूर्ती अस्तित्त्वात असल्याचेही संशोधकांचे मत आहे. खंडोबा मूळचा आंध्र प्रदेशातला. आंध्र तेलंगणात तो मल्लणा-मल्लिकार्जुन नावाने ओळखला जातो. आंध्रात केतम्मा आणि मेडलम्मा अशा दोन बायका त्याला असून, त्या दोघीही गोपालक- शिकारी जमातीच्या आहेत. कोमरवेल्ली धट्ट मल्लणा, आयरगल्ली येथील धट्ट मल्लणा, वरंगळ येथील कट्ट मल्लणा पेदिपाड (नल्लूर), पेनुगोंडे (अनंतपूर), मल्लालपत्रन ही आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध मंदिरे आहेत. हैदराबाद येथे मुळात मुस्लिम समाजाचा असलेला मल्लणा, नंतर वरंगळ येथे निघून गेल्याचे सांगितले जाते. याशिवाय ओदिल्ला-गणेशपुरी अशा सतरा-अठरा ठिकाणी खंडोबाची भव्य मंदिरे आहेत….
खंडोबाची कथा काय आहे?
आख्यायिका आणि लोककथांनुसार खंडोबा हा भगवान शिवाचा मानव अवतार होता; तो जेजुरी-गड (अनुवाद. जेजुरी किल्ला) येथून राहत होता आणि त्या प्रदेशावर राज्य करत होता, जिथे आता मंदिर आहे. मंदिराला जेजुरी-गड असेही म्हणतात. खंडोबाने मणि आणि मल्ल या राक्षस बंधूंना मारले, जेव्हा त्यांनी लोकांना त्रास दिला .
खंडोबाचा जन्म कधी झाला?
खंडोबाचे चरित्र ९ व्या आणि १० व्या शतकात लोकदेवतेपासून शिव, भैरव, सूर्य आणि कार्तिकेय (स्कंद) या गुणांनी युक्त असलेल्या संमिश्र देवतेत विकसित झाले. त्याला एकतर लिंगाच्या रूपात किंवा बैल किंवा घोड्यावर स्वार झालेल्या योद्ध्याची प्रतिमा म्हणून चित्रित केले आहे.
खंडोबा नाव कसे पडले?
नाव एका मतानुसार खंडोबा हे नाव या देवतेच्या खंडा (संस्कृत खड्ग -> मराठी खंडा) या शस्त्रावरून आले आहे. दुसऱ्या मतानुसार हा संस्कृत स्कंद शब्दाचा अपभ्रंश आहे. (स्कंद -> स्कंदोबा -> खंडोबा) याखेरीज मल्हारी(मल्लारी), खंडेराय, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत, रवळनाथ, येळकोटी(येळ=सात,सात कोटी सैन्य असलेला) ही खंडोबाची इतर नावे होत.
खंडोबा ला किती बायका आहेत?
म्हाळसा वाण्याची, तर बानू धनगराची. याशिवाय फुलाई माळीण, रंभाई शिंपीण, चंदाई बागवानीण अशा एकूण पाच बायका खंडोबास होत्या, असा निर्देश वाघ्यामुरळीच्या गाण्यांमध्ये येतो. खंडोबा मूळचा आंध्र प्रदेशातला.
म्हाळसा आणि मार्तंड कोण?
कालांतराने भगवान शिव मार्तंड भैरव म्हणून जन्माला आले आणि त्यांनी मल्हार नावाच्या राक्षसावर विजय मिळवला. म्हणून त्याला मल्हारी, खंडोबा असेही म्हणतात. तिमा शेट यांच्या घरी मोहिनीचा जन्म झाला आणि मुलाचे नाव महालसा ठेवण्यात आले.
काल भैरव
कालभैरव हे भगवान शिवाच्या तीव्र स्वरूपांपैकी एक आहे . तो त्याच्या एका हातात डोके कुबडणारा एक दुष्ट देवता म्हणून चित्रित करतो. भक्तांचा असा विश्वास आहे की देव जे मस्तक धारण करतो ते ब्रह्मदेवाचे 5 वे डोके होते, जे भगवान शिवाने त्यांचा अहंकार कापण्यासाठी तोडले होते. ब्लॅक डॉग हे वाहन (वाहन) आहे ज्यावर तो बसतो.
खंडोबाचा कुत्रा व घोडा
लोककथा या देवतेस पौराणिक शिव व वैदिक रुद्र यांचा पूर्णावतार मानतात. खंडोबाच्या परिवारातील इतर सदस्यांचेंही वैदिकीकरण झाले आहे. यामुळे म्हाळसा बाणाई या पार्वती व गंगा यांच्या, रक्त पिणारा खंडोबाचा कुत्रा कृष्णाचा तर शुभ्र घोडा नंदीचा अवतार मानला गेला.